Thursday, December 8, 2016

शिवराई



शिवराई

             नाण्याच्या कडेनी बिंदुमय वर्तुळ (dotted border) असणार्या शिवराईला संग्राहक मुळ शिवराई म्हणुन ओळखतात. या शिवराईवर पुढिल बाजुनी तीन ओळीत- श्री/राजा /शिव आणि मागील बाजुनी- छत्र/पति असे दोन ओळीत लिहीलेले असते. बिंदुमय वर्तुळ असणार्या शिवराई सुबक  असुन पुढील व मागील बाजु व्यवस्थित जुळविलेल्या असतात,पण सद्ध्याच्या परिस्थितीत या शिवराई मिळवणं खुप कठिण झालेलं आहे. या शिवरायांचे वजन 11 ते 13 ग्रॅम्स मधे आढळते.या शिवराईला संग्राहक रायगड शिवराई म्हणजे रायगडच्या टांकसाळीतुन पाड्लेली शिवराई मानतात.

“रायगड शिवराई”

             शिवराई नेमक्या किती टांसाळीतुन पाडल्या जात होत्या हे अद्याप सांगता येत नसले तरी त्यांच्या अक्षरांच्या लिखाणाच्या विविधतेवरुन किमान त्या दहा ठिकाणच्या टांकसाळीतुन तयार झाल्या असाव्या किंवा याहिपेक्षा महाराजांच्या जास्त टांकसाळी असाव्यात. छत्रपति शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यात टांकसाळ असण्याची शक्यता देखिल नाकारता येत नाही.
          छत्रपति शिवाजी महाराजांची कडेनी बिंदुमय वर्तुळ असलेली शिवराई जीला “रायगड शिवराई” म्हणून देखिल ओळखले जाते तिचे वजन 12.36 ग्रॅम च्या आसपास आहे तर अर्धी शिवराई 6.18 ग्रॅम च्या आसपास आहे. पुढे शिवराईचे वजन कमी होत गेले व शिवराई 11 ग्रॅम तर अर्धी शिवराई 5.5 ग्रॅम ची आहे. या शिवराईचा आकार 2 सें.मी आहे. यानंतरच्या शिवराया या 10 ग्रॅमच्या आसपास आहेत तर अर्धी शिवराई 5 ग्रॅम ची आहे.
“अर्धी शिवराई”
तसेच काही 1.5, 2, 3, 4 ग्रॅम च्या शिवराया देखिल उपलब्ध आहेत त्यांना बहुदा “रुके” म्हणत असावेत.
“रुका ?”


“शिवराई” नाण्यांबद्दल ची अशीच माहीती मी आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन,
पुढील पोस्ट लवकरचं……….

कसं वाटलं जरुर कळवा……
                             contact no- 8698825074
email- ashutoshp1010@gmail.com
photos from-p.g.bhargave