Friday, January 27, 2017

शंभुछत्रपतिंचे चलन
शिवराई

भाग-1
              मागिल दोन पोस्ट मधे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या  “शिवराई” या नाण्याची माहीती घेतली, छत्रपति शिवाजी महाराजांनंतर” शिवछत्रपतिंप्रमाणेच संभाजी महाराजांनिही त्यांची ताम्र नाणी पाडली ज्यांना त्याकाळी “शिवराई या नावाने संबोधत असावेत.पुढील तिन-चार पोस्ट मधे आपण संभाजी महाराजांच्या नाण्यांबद्द्ल जाणनार आहोत.
             छत्रपति शिवाजी  महाराजांनी 1680 पर्यंत स्वराज्याचा राज्यकारभार  पाहील्यानंतर त्यांचे पुत्र छत्रपति संभाजी महाराज राज्यावर आले. 1681 ला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडल्यानंतर महाराजांनी स्वराज्याचा राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली. छत्रपति शिवाजी महाराजांनी सुरु केलेले स्वराज्याचे स्वचलन पुढे संभाजी महाराजांनी ही सुरु ठेवले असे दिसते. राज्याभिशेकानंतरचं संभाजी महाराजांनी नाणी पाडण्यास सुरुवात केली असावी. संभाजी महाराजांच्या धावपळिच्या जीवनामुळे आणि कमी कार्यकाळामुळे त्यांची नाणी ही अत्यंत दुर्मिळ असुन आज खुप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.
           ही नाणी शिवाजी महाराजांच्या नाण्यांसारखीच असुन यावर पुढील बाजुनी  “श्री/ राजा/ शिव” च्या एवजी “श्री/ राजा/ शंभु” असे अंकीत केलेले असुन मागील बाजु ही समान म्हणजेचं “छत्र/ पति” अंकीत केलेली असते. जसे आपणास माहीत आहे की संभाजी महाराजांचे उपनाम हे “शंभु” होते त्या कारनाने नाण्यावर पुर्ण “संभाजी” न लिहीता “शंभु” या नावाचा प्रयोग केला असावा. या ताम्र नाण्याचे वजन 10 ते 12 ग्रॅम पर्यंत आढळते. या नाण्यांचे वजन त्यावरील अक्षराचे वळन त्यावरील बिंदुमय वर्तुळ हे शिवछत्रपतिंच्या नाण्याप्रमानेचं आढळते.
            शिवाजी, संभाजी महाराजांची नाणी ही धातुवर हातोड्याने ठोकुन बनवल्यामुळे त्यावरील काही अक्षरे ही नाण्याबाहेर गेलेली  असतात. या प्रकारे पाडलेल्या नाण्यांना क्रुड काईन्स म्हणतात.
                               
·       * छत्रपति संभाजी महाराजांची “शिवराई”

“शिवराई” हे नाणे तांब्याचे असुन त्यावर पुढील बाजुनी बिंदुमय वर्तुळात तिन ओळीत “श्री/ राजा/ शंभु” व मागील बाजुनी बिंदुमय वर्तुळात दोन ओळीत “छत्र/ पति” अशी अक्षरे अंकीत केलेले असतात.









“शिवराई” नाण्यांबद्दल ची अशीच माहीती मी आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन,
पुढील पोस्ट लवकरचं……….

कसं वाटलं जरुर कळवा……

                             contact no- 8698825074
email- ashutoshp1010@gmail.com
photos from- vinaykumar chumble.