Tuesday, April 4, 2017

शंभुछत्रपतिंचे चलन
“शिवराई”
भाग-४
संभाजी महाराजांच्या चलनाच्या माहीती संबंधीचा हा चौथा भाग सादर करीत आहे. पहील्या तिन भागात तिन विविध प्रकारच्या शिवराई आपण 
पाहील्या.


शिवाजी महाराजांच्या काही क्वचित मिळनार्या नाण्यांवर अजुन एक बदल आढळतो, यावर “श्री/ राजा/ सीव” असे तिन ओळीत न येता “श्रीराजा” एका  ओळीत तर “सीव” हे दुसर्या ओळीत आलेले आढळते, ही नाणी खुप कमी आढळतात, आणि हाचं प्रकार आपल्याला संभाजी महाराजांच्या नाण्यांवर ही पहायला मिळतो.
·         
     



संभाजी महाराजांचे वेगळ्या प्रकारचे नाणे-

संभाजी महाराजांच्या या प्रकारातील नाण्यांवर पहिल्या ओळीत तिन पाकळ्यांचे फुल, दुसर्या ओळीत “श्रीराजा” आणि तिसर्या ओळीत “शंभु” असे अंकीत केलेले असुन मागील बाजुवर दोन ओळीत “छत्र/ पति” ही अक्षरे अंकीत केलेली असतात. या नाण्याचे वजन हे  10 ते 12 ग्रॅम मधेचं आढळत असुन याचा आकार हा वर दाखवलेल्या शंभु प्रमाणेचं आढळतो.काहि संग्राहकांना विचारले असता ही नाणी त्यांना लातुर-चंद्रपुर भागात सापडली आहेत असे ते सांगतात, 1686 नंतर च्या युद्धांदरम्यान महाराज तिकडच्या पट्यात होते असे दिसते तर ही नाणी त्यांनी त्या काळात तिकडे पाडली असावीत,पण यावर काही ठोस पुरावा नसल्याने आपण फ़क्त अंदाजचं मांडु शकतो, बारकाईने निरिक्षन केल्यास या नाण्यावर  पुढील बाजुवरील “शंभु” आणि मागील बाजुवरील “पति” या शब्दांखाली आडव्या रेषा आलेल्या दिसुन येतात, तर आणखी एक म्हणजे या नाण्यावरील “पति” या शब्दाचा “ति” हा उलटा अंकीत केलेला आहे तसेच पुढील बाजुवर पहील्या ओळित तिन पाकळ्यांचे फुल अंकीत केलेले आपल्याला दिसते.
 





“शिवराई नाण्यांबद्दल ची अशीच माहीती मी आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन,
पुढील पोस्ट लवकरचं……….

कसं वाटलं जरुर कळवा……
    contact no- 8698825074
email- ashutoshp1010@gmail.com
photos curtesy- Kiran Karande.