Monday, May 8, 2017

शंभुछत्रपतिंचे चलन

शंभुछत्रपतिंचे चलन
“शिवराई”
भाग-5
संभाजी महाराजांच्या चलनाच्या माहीती संबंधीचा हा पाचवा आणि शेवटचा भाग सादर करीत आहे. चार भागात चार विविध प्रकारच्या शिवराई आपण पाहील्या.

* संभाजी महाराजांचे वेगळ्या प्रकारचे नाणे-

संभाजी महाराजांच्या नाण्याचा आणखी एक प्रकार निदर्शनास आलेला आहे. या नाण्यावरील अक्षरलेखन हे बाकी नाण्यांपेक्षा अत्यंत वेगळे आहे. या नाण्यावर पुढील बाजुनी - पहील्या ओळित “श्रीरा” दुसर्या ओळीत “जाशं” आणी तिसर्या ओळित “भु” अशी अक्षरे अंकीत केलेली असुन मागील बाजु नी दोन ओळीत “छत्र/ पति” अंकित केलेले आहे. याचं प्रकारची काही नाणी ही शिवाजी महाराजांनी जिंजी भागातुन पाडलेली आढळतात. त्या नाण्यांवर पुढील बाजुनी पहिल्या ओळीत “श्रीरा”  दुसर्या ओळीत “जाशि” आणी तिसर्या ओळित “व” अशी अक्षरे अंकीत केलेली असुन मागील बाजुनी दोन ओळीत “छत्र/ पति” अंकित केलेले आहे.
अशा प्रकारच्या संभाजी महाराजांच्या शिवराया आपल्याला आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या आहेत, या शोधनिबंधासाठी मला फोटो उपलब्ध करुन दिल्याबद्द्ल मी श्री.किरण करांडे, श्री.प्रशांत ठोसर , श्री.किरण शेलार, श्री.अमीत लोमटे आणी श्री. विनय चुंबळे यांचे मनःपुर्वक आभार मानतो.
संभाजी महाराजांची ही “शंभुराई” आज अत्यंत दुर्मिळ झालेली असुन खुपचं क्वचित आज पहायला मिळते, बहुतेक त्यांच्या कमी कार्य काळामुळे ती कमी चलनात असावी व कमीचं पाडलेली असावी, त्यामुळे ती आज एक मौल्यवान गोष्ट झालेली आहे. संभाजी महाराजांना तसे पहाता खुप कमी काळ आयुश्य लाभले पण महाराजांनी या राज्यकर्त्या 9 वर्शांत जे करुन दाखवलं ते कोनी 50 वर्शांतही करु शकणार नाही असं मला वाटतं, महाराजांच्या या कर्तुत्वाला मानाचा मुजरा !!!!!

 “शिवराई” नाण्यांबद्दल ची अशीच माहीती मी आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन,
पुढील पोस्ट लवकरचं.....

कसं वाटलं जरुर कळवा......

        contact no- 8698825074
email- ashutoshp1010@gmail.com
photos curtesy- Kiran Karande.