Friday, August 24, 2018

#Spink's mistake and my excitement !


#स्वराज्याचे_चलन


"#स्वराज्याचे_चलन" लिहिताना आलेला हा एक अनुभव आपल्यासोबत शेअर करतोय... 

स्वराज्याचे चलन लिहिताना रेफेरेंसेस मध्ये कुठेतरी वाचण्यात आलं कि १९९० साली स्पिंक ऑक्शन मध्ये शिवरायांच्या नावे असलेले २ शिवराई होन विकले गेले होते. त्यावेळी मी विविध डाय व्हरायटी असलेल्या शिवराई होणाच्या शोधात होतो. मी कॅटलॉग शोधण्याचा प्रयत्न केला सापडला नाही, पण ते २ होन कोणते हे पाहण्याची उत्सुकता होतीच... मग मी स्पिंक, लंडन च्या ऑफिस ला कॉन्टॅक्ट केला, त्यांना त्या कॅटलॉग बद्दल विचारल पण ते हि म्हणाले कि आता तो कॅटलॉग आमच्याकडेहि उपलब्ध नाही पण आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो. 


काही दिवसांनी त्यांचा रिप्लाय आला आणि कॅटलॉग मिळाला असा त्यांनी सांगितलं. मी त्यांना लॉट न ५९१ आणि लॉट न ५९२ च्या माहितीबद्दल विचारलं आणि काही दिवसात त्यांनी त्या कॅटलॉग मधील त्या डिटेल्स ची स्कॅन कॉपी पाठवली. मी ती पीडीफ वाचू लागलो लॉट न ५९१ बद्दल वाचून तर मला आश्चर्य वाटले त्यात लिहिलं होत कि "हा होन शिवाजी महाराजांच्या नावे असून यावर ५० असा आकडा आहे". हे वाचून काहीस वेगळं वाटलं. मी चेक केलं तर फोटो काही त्यांनी जोडलेले नव्हते मग मी त्यांच्याकडे फोटोबद्दलची मागणी केली. खरं तर ५० असा आकडा असलेला होन अजून तरी नजरेस आलेला नव्हता मी तो पाहण्यास अत्यंत उत्सुक होतो पण मला ते काही चिन्ह असावे अशी शंका होती. काही दिवसातच त्यांचा रिप्लाय आला त्यांनी स्कॅन फोटोस पाठवलेले होते. ते फोटोस मी पाहिले आणि शंकेचे निसरण झाले मला जे वाटले होते हे तेच होते. त्या नाण्यांवरील तो ५० आकडा नसून ते "चंद्र & सूर्य" चे चिन्ह होते. स्पिंक ऑक्शन ची झालेली चूक मी त्यांना सांगितली आणि ती चूक मी सुधारली तो होन "स्वराज्याचे चलन" पुस्तकात पा नं ४० वर 'शिवराई होन प्रकार क्र २.१' असा वर्गीकरीत केलेला आहे. या अनुभवात स्पिंक ऑक्शन ने मला लावलेली उत्सुकता हि शब्दात सांगणे कठीण...

#स्वराज्याचे_चलन
#अनुभव १
#आशुतोष_पाटील
#चुकलेला "जी"
#स्वराज्याचे_चलन #अनुभव_२ 


कधी कधी चुकिला बरोबर समजुन आपण पुढे चालत असतो पण योग्य वेळी हे चुकीचे आहे हे आपल्याला कळतेच आणि ते महत्वाचे असते. मी ९ वी-१० वी असताना या नाणकशास्त्रात उतरलो तोवर तर नाणं म्हणजे फक्त पैसे जे की आपल्याला एखादी वस्तु घेण्यासाठी उपयोगी असतात एवढंच माहीती होतं पण या क्षेत्रात उतरलो आणि एक मोठा दरवाजा माझ्यासाठी उघडला. मला आठवतय की २०१५ साली झालेलं "रेयर फेयर २०१५" हे मी पाहीलेलं नाण्यांचं पहिलं प्रदर्शन त्या आधी तर मी याबाबत अनभिज्ञ होतो. हे प्रदर्शन पहाण्याआधी नाण्यांबद्दलची काही ठरावीक पुस्तकं मी वाचली होती. त्यावेळी एक वाचकाच्याच नजरेनी मी ती पुस्तक वाचीे होती यातील काही चुकही असु शकते ही तर शंकाच मनात आली नव्हती.
मी त्यात वाचलं होतं की "जी" अक्षर असलेले तांब्याचे नाणे हे शिवछत्रपतिंनी आपल्या राज्याभिषेकाआधी म्हणजे १६६४ पासुन १६७४ पर्यंत चालविले होते आणि त्यावर पुर्ण विश्वास ठेउन मी त्या नाण्याच्या शोधात होतो. महाराजांचे राज्याभिषेकाआधीचे नाणे म्हणजे त्याचे महत्व तर अनन्यसाधारणचं ! आणि त्याच काळात मला कुठुनतरी माहीती मिळाली की या नाण्यांचे प्रदर्शन होत असतात आणि नाशिक ला असेच एक प्रदर्शन होत असते आणि मी त्या प्रदर्शनास पोहोचलो. हे फार काही वेगळचं होतं. शिवाजी महाराजांच्या नाण्यांबद्दल वाचलेलं होतं, हेही वाचलं होती की "जी" लिहलेलं नाणं शिवाजी महाराजांचे आहे आणि त्यांनी ते १६६४ ला टांकसाळीत केले.
एका व्यापाऱ्याने मला एक नाण्यांचा एक अल्बम दाखवला. मी पाहु लागलो. त्यात मला "जी" लिहीलेलं एक नाणं दिसलं, मी काही सेकंदातच ते नाणं अल्बमच्या बाहेर काढलं आणि मला हवं अशी मागणी करु लागलो. त्यांनी मला विचारलं की तुला हे नाणं का हवय? आणि तु कोणत्या नाण्यांचा संग्रह करतोस? मी सांगितलं, मी शिवाजी महाराजांच्या नाण्यांचा संग्रह करतो आणि त्या नाण्यांचा मला अभ्यास करायचाय. त्यावर ते म्हणाले मग तुला हे नाणं का हवयं? हे तर रांधनपुर राज्याचं नाणं आहे. त्यावर मी उत्तरलो की हे शिवाजी महाराजांचंच नाणं आहे आणि पुस्तकात मी याबद्दल वाचलय (चुक/बरोबर काय असत हे माहीती नसल्यावर असं होतं) त्यावर ते म्हणाले की आमच्याकडे तर हे नाणे मोठ्या प्रमाणात मिळतात, तुला कीती हवेत ते सांग. 
तेव्हा तर मी ते नाणं त्यांच्याकडुन विकत घेतलं आणि त्याच नाण्याने माझ्यातली संशोधक वृत्ती जागी केली. आणि बाकी लेखकांकडुन आधी झालेली चुक सुधारण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. काही प्रमाणात का होइना मी त्यात यशस्वी झालो आणि "जी" लिहिलेले नाणे शिवाजी महाराजांचे नसुन हे गुजरातमधील रांधनपुर राज्याच्या बिसमील्ला खानाचे नाणे आहे ज्यानी इ.स १८८४ ते इ.स १८९५ पर्यंत राज्य केले हे सांगु लागलो !

-आशुतोष पाटील.