Tuesday, March 14, 2017



शंभुछत्रपतिंचे चलन
शिवराई
भाग-3
संभाजी महाराजांच्या चलनाच्या माहीती संबंधीचा हा तिसरा भाग सादर करीत आहे. पहील्या दोन भागात दोन विविध प्रकारच्या शिवराई आपण पाहील्या. “श्री/ राजा/ शंभु” ,“छत्र/ पति”  “श्री/ राजा/ संभु” ,“छत्र/ पति” हे दोन प्रकार मागील दोन भागात आपन पाहीले.
 आता हे पुढील संभाजी महाराजांच्या नाण्यावर येनारी विविध चिन्हे तसेच श्री/राजा/शंभुयातील श्री या अक्षराचे विविध वळन या भागात आपण पाहनार आहोत.


·         “श्री” अक्षराचे वेगवेगळे वळण- 


 श्री/ राजा/ शंभु/ छत्र/ पति लीहीलेल्या या शंभुराईंवर श्री या अक्षराचे दोन विविध प्रकारात लिखान आढळते, यामधील पहिल्या प्रकारात “श्री” हा साधारण असतो.




 





दुसर्या प्रकारात “श्री” या अक्षरामधुन एक तिरपी रेघ गेलेली असते आणी या नाण्यावर “श्री” अक्षराच्या च्या बाजुला एक बारीक फुल आलेले आपल्याला दिसते.



·    


     “छत्र” शब्दाच्या वर चांदणी-





आणखी एक नाणे आढळलेले आहे ज्यावर पुढील -मागील बाजुचे लेखन समान असुन फ़क्त त्या नाण्यावर छत्र या शब्दाच्या वर एक चांदणी अंकीत केलेली आहे.










“शिवराई” नाण्यांबद्दल ची अशीच माहीती मी आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन,
पुढील पोस्ट लवकरचं……….

कसं वाटलं जरुर कळवा……

                            
        contact no- 8698825074
photos curtesy- pashant thosar,kiran shelar.

Sunday, February 5, 2017

शंभुछत्रपतिंचे चलन
शिवराई
भाग-2
संभाजी महाराजांच्या चलनाच्या माहीती संबंधीचा हा दुसरा भाग आहे. पहील्या भागात पहील्या प्रकारचे संभाजी महाराजांचे नाणे आपण पाहीले, ज्यावर पुढील बाजुनी “श्री/ राजा/ शंभु” असे अंकीत केलेले असुन मागील बाजुनी “छत्र/ पति” अंकीत केलेली असते.

               राजा सिव, राजा सीव
शिवाजी महाराजांच्या काही नाण्यांवर आपल्याला लेखनात बदल आढळलेला आहे त्यात विविधता  पहायला मिळतात, जसे “शिव”या शब्दाएवजी सिव, सीव, शीव असे अंकीत केलेले आढळते. तसेच संभाजी महाराजांच्या नाण्यावर देखिल हा बदल आढ्ळलेला आहे. संभाजी महाराजांच्या या काही नाण्यांवर “शंभु” या शब्दाएवजी “संभु” हा शब्द अंकीत केलेला आहे.

·       
  संभाजी महाराजांचे हे दुसर्या प्रकारचे नाणे-



“श्री/ राजा/ संभु” व “छत्र/ पति”
हे नाणे ही तांब्याचे असुन त्यावर पुढील बाजुनी बिंदुमय वर्तुळात तिन ओळीत “श्री/ राजा/ संभु” व मागील बाजुनी बिंदुमय वर्तुळात दोन ओळीत “छत्र/ पति” अशी अक्षरे अंकीत केलेले असतात. या नाण्याचे वजन, आकार, लेखन हे सर्व शंभु लिहीलेल्या नाण्यासारखेच असुन फ़क्त यावर “शंभु” या शब्दाएवजी “संभु” हा शब्द अंकीत केलेला आहे. बारकाईने निरिक्षन केल्यास
उलटा “छ”
या नाण्यावरील “छत्र” चा “छ” हा उलटा अंकीत केलेला आहे हे लक्षात येते. ही नाण्यासाठी डाय बनवनार्या कामगाराची चुक आहे असे दिसते. काही संग्राहकांना विचारले असता त्यांना ही नाणी कोल्हापुर भागात सापडली आहेत असे ते सांगतात, म्हणजे बहुदा ही नाणी तिकडेच टांकसाळीत करण्यात (पाडण्यात) आली असावीत, पण त्यावर काही ठोस पुरावा नसल्याने नेमकी ही नाणी कोणत्या टांकसाळीत पाडली हे सांगणे कठीण आहे.







“शिवराई” नाण्यांबद्दल ची अशीच माहीती मी आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन,
पुढील पोस्ट लवकरचं……….

कसं वाटलं जरुर कळवा……

photo curtesy- ameet lomate.

Friday, January 27, 2017

शंभुछत्रपतिंचे चलन
शिवराई

भाग-1
              मागिल दोन पोस्ट मधे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या  “शिवराई” या नाण्याची माहीती घेतली, छत्रपति शिवाजी महाराजांनंतर” शिवछत्रपतिंप्रमाणेच संभाजी महाराजांनिही त्यांची ताम्र नाणी पाडली ज्यांना त्याकाळी “शिवराई या नावाने संबोधत असावेत.पुढील तिन-चार पोस्ट मधे आपण संभाजी महाराजांच्या नाण्यांबद्द्ल जाणनार आहोत.
             छत्रपति शिवाजी  महाराजांनी 1680 पर्यंत स्वराज्याचा राज्यकारभार  पाहील्यानंतर त्यांचे पुत्र छत्रपति संभाजी महाराज राज्यावर आले. 1681 ला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडल्यानंतर महाराजांनी स्वराज्याचा राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली. छत्रपति शिवाजी महाराजांनी सुरु केलेले स्वराज्याचे स्वचलन पुढे संभाजी महाराजांनी ही सुरु ठेवले असे दिसते. राज्याभिशेकानंतरचं संभाजी महाराजांनी नाणी पाडण्यास सुरुवात केली असावी. संभाजी महाराजांच्या धावपळिच्या जीवनामुळे आणि कमी कार्यकाळामुळे त्यांची नाणी ही अत्यंत दुर्मिळ असुन आज खुप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.
           ही नाणी शिवाजी महाराजांच्या नाण्यांसारखीच असुन यावर पुढील बाजुनी  “श्री/ राजा/ शिव” च्या एवजी “श्री/ राजा/ शंभु” असे अंकीत केलेले असुन मागील बाजु ही समान म्हणजेचं “छत्र/ पति” अंकीत केलेली असते. जसे आपणास माहीत आहे की संभाजी महाराजांचे उपनाम हे “शंभु” होते त्या कारनाने नाण्यावर पुर्ण “संभाजी” न लिहीता “शंभु” या नावाचा प्रयोग केला असावा. या ताम्र नाण्याचे वजन 10 ते 12 ग्रॅम पर्यंत आढळते. या नाण्यांचे वजन त्यावरील अक्षराचे वळन त्यावरील बिंदुमय वर्तुळ हे शिवछत्रपतिंच्या नाण्याप्रमानेचं आढळते.
            शिवाजी, संभाजी महाराजांची नाणी ही धातुवर हातोड्याने ठोकुन बनवल्यामुळे त्यावरील काही अक्षरे ही नाण्याबाहेर गेलेली  असतात. या प्रकारे पाडलेल्या नाण्यांना क्रुड काईन्स म्हणतात.
                               
·       * छत्रपति संभाजी महाराजांची “शिवराई”

“शिवराई” हे नाणे तांब्याचे असुन त्यावर पुढील बाजुनी बिंदुमय वर्तुळात तिन ओळीत “श्री/ राजा/ शंभु” व मागील बाजुनी बिंदुमय वर्तुळात दोन ओळीत “छत्र/ पति” अशी अक्षरे अंकीत केलेले असतात.









“शिवराई” नाण्यांबद्दल ची अशीच माहीती मी आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन,
पुढील पोस्ट लवकरचं……….

कसं वाटलं जरुर कळवा……

                             contact no- 8698825074
email- ashutoshp1010@gmail.com
photos from- vinaykumar chumble.



Thursday, December 8, 2016

शिवराई



शिवराई

             नाण्याच्या कडेनी बिंदुमय वर्तुळ (dotted border) असणार्या शिवराईला संग्राहक मुळ शिवराई म्हणुन ओळखतात. या शिवराईवर पुढिल बाजुनी तीन ओळीत- श्री/राजा /शिव आणि मागील बाजुनी- छत्र/पति असे दोन ओळीत लिहीलेले असते. बिंदुमय वर्तुळ असणार्या शिवराई सुबक  असुन पुढील व मागील बाजु व्यवस्थित जुळविलेल्या असतात,पण सद्ध्याच्या परिस्थितीत या शिवराई मिळवणं खुप कठिण झालेलं आहे. या शिवरायांचे वजन 11 ते 13 ग्रॅम्स मधे आढळते.या शिवराईला संग्राहक रायगड शिवराई म्हणजे रायगडच्या टांकसाळीतुन पाड्लेली शिवराई मानतात.

“रायगड शिवराई”

             शिवराई नेमक्या किती टांसाळीतुन पाडल्या जात होत्या हे अद्याप सांगता येत नसले तरी त्यांच्या अक्षरांच्या लिखाणाच्या विविधतेवरुन किमान त्या दहा ठिकाणच्या टांकसाळीतुन तयार झाल्या असाव्या किंवा याहिपेक्षा महाराजांच्या जास्त टांकसाळी असाव्यात. छत्रपति शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यात टांकसाळ असण्याची शक्यता देखिल नाकारता येत नाही.
          छत्रपति शिवाजी महाराजांची कडेनी बिंदुमय वर्तुळ असलेली शिवराई जीला “रायगड शिवराई” म्हणून देखिल ओळखले जाते तिचे वजन 12.36 ग्रॅम च्या आसपास आहे तर अर्धी शिवराई 6.18 ग्रॅम च्या आसपास आहे. पुढे शिवराईचे वजन कमी होत गेले व शिवराई 11 ग्रॅम तर अर्धी शिवराई 5.5 ग्रॅम ची आहे. या शिवराईचा आकार 2 सें.मी आहे. यानंतरच्या शिवराया या 10 ग्रॅमच्या आसपास आहेत तर अर्धी शिवराई 5 ग्रॅम ची आहे.
“अर्धी शिवराई”
तसेच काही 1.5, 2, 3, 4 ग्रॅम च्या शिवराया देखिल उपलब्ध आहेत त्यांना बहुदा “रुके” म्हणत असावेत.
“रुका ?”


“शिवराई” नाण्यांबद्दल ची अशीच माहीती मी आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन,
पुढील पोस्ट लवकरचं……….

कसं वाटलं जरुर कळवा……
                             contact no- 8698825074
email- ashutoshp1010@gmail.com
photos from-p.g.bhargave

Tuesday, November 29, 2016

शिवछत्रपतिंच्या नाण्यांबद्द्ल प्राथमिक माहीती..........

   शिवछत्रपतिंच्या नाण्यांबद्द्ल प्राथमिक माहीती

 “छत्रपतिंची शिवराई” या ब्लॊग वरील ही पहीली पोस्ट आहे,यामध्ये आपण शिवछत्रपतिंच्या नाण्यांबद्द्ल प्राथमिक माहीती घेणार आहोत, हा माझा प्रयत्न तुम्हाला नक्किचं आवडेल ही आशा करतो.
       ६ जुन १६७४, जेष्ठ शुद्ध त्रियोदशी, शनिवार ये दिवशी शिवाजी महाराज “सिंहासनाधीश्वर” झाले. रायगडावर आनंदी-आनंद झाला होता,आज एक “मराठा राजा” सिंहासनाधीष्टीत नृपती झाला होता. सभासदाच्या तोंडून पडलेले ते उद्गार या सर्वाची साक्ष देउन जातात, सभासद म्हणतो “ये पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा येवढा मर्हाटा पातशाहा “छत्रपति” जाहला ही गोष्ट काही सामान्य जाहली नाही” यांचे वरील वर्णन महाराजांच्या दैदिप्यमान, अतुलनीय अशा राज्याभिषेक सोहळ्याची यथोचित माहिती देते….
      या दिवशी राज्याभिषेक सोहळ्याला “हेन्री आक्झिंडेन” नावाचा इंग्रज अधिकारी देखिल उपस्थित होता,त्या दिवशी त्याने शिवाजी महाराजांना विविध २० मागन्या केल्या होत्या, त्यातील एक मागनी होती की “इंग्रजी चलन स्वराज्यात चालु द्यावं”, त्या २० मागन्यांपैकी महाराजांनी १९ मागन्या मान्य करुन एक मागनी मात्र अमान्य केली ती म्हणजे “इंग्रजी चलन स्वराज्यात चालु द्यावं”,त्याला प्रतीउत्तर म्हणून महाराजांनी त्यांना सांगीतलं कि “इंग्रजी शिक्क्याचे रुपये वा पैसे वा मोरा या मुलुकात चालणार नाहीत !!!”……………..

इ.स.१६७४ पासुन शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचं स्वचलन सुरु केलं असावं,ज्याला आपणं “शिवराई” म्हणतो तांब्याच्या शिवराई बरोबरचं महाराजांनी सोन्याचे “होणं” देखिल सुरु केले,तद्वत त्यांनी मोगली वर्चस्वाला व पर्शियन भाषेच्या प्रभावाला झुगारुन देवनागरी लिपीत   पाडलेली स्वतःची “नाणी” ही एक दुरगामी व क्रांतीकारी घटना होती. बिंदुमय वर्तुळात एका बाजुला तिन ओळीत “श्री राजा शिव” व दुसर्या बाजुस दोन ओळीत “छत्रपत्ती” असे महाराजांच्या नाण्याचे सर्वसाधारण स्वरुप होते.तांब्याच्या या शिवराई पैशाचे वजन साधारणतः १२ ते १४ ग्रॅम इतके असते.शिवाजी महाराजांना आपल्या हिंदु धर्माचा रास्त अभिमान होता असे यावरून दिसते. तसेच मोगलांप्रमाणे सोन्याच्या मोहोरा न पाडता विजयनगरच्या हिंदू साम्राज्याच्या धर्तीवर सोन्याचे २.७२८ ग्रॅम वजनाचे होन पाडले.त्यावरही शिवराई प्रमाणे बिंदुमय वर्तुळात एका बाजुला तिन ओळीत “श्री राजा शिव” व दुसर्या बाजुस दोन ओळीत “छत्रपत्ती” असे लिहीलेले असे.
“शिवराई” नाण्यांबद्दल ची अशीच माहीती मी आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन,
पुढील पोस्ट लवकरचं……….

कसं वाटलं जरुर कळवा……
                             contact no- 8698825074
email- ashutoshp1010@gmail.com