शिवछत्रपतिंच्या नाण्यांबद्द्ल प्राथमिक माहीती
“छत्रपतिंची शिवराई” या ब्लॊग वरील ही पहीली
पोस्ट आहे,यामध्ये आपण शिवछत्रपतिंच्या नाण्यांबद्द्ल प्राथमिक माहीती घेणार आहोत,
हा माझा प्रयत्न तुम्हाला नक्किचं आवडेल ही आशा करतो.
६ जुन १६७४, जेष्ठ शुद्ध त्रियोदशी, शनिवार ये
दिवशी शिवाजी महाराज “सिंहासनाधीश्वर” झाले. रायगडावर आनंदी-आनंद झाला होता,आज एक
“मराठा राजा” सिंहासनाधीष्टीत नृपती झाला होता. सभासदाच्या तोंडून पडलेले ते उद्गार
या सर्वाची साक्ष देउन जातात, सभासद म्हणतो “ये पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा येवढा मर्हाटा
पातशाहा “छत्रपति” जाहला ही गोष्ट काही सामान्य जाहली नाही” यांचे वरील वर्णन महाराजांच्या दैदिप्यमान, अतुलनीय अशा राज्याभिषेक सोहळ्याची
यथोचित माहिती देते….


इ.स.१६७४ पासुन शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचं स्वचलन सुरु केलं असावं,ज्याला आपणं “शिवराई” म्हणतो तांब्याच्या शिवराई बरोबरचं महाराजांनी सोन्याचे “होणं” देखिल सुरु केले,तद्वत त्यांनी मोगली वर्चस्वाला व पर्शियन भाषेच्या प्रभावाला झुगारुन देवनागरी लिपीत पाडलेली स्वतःची “नाणी” ही एक दुरगामी व क्रांतीकारी घटना होती. बिंदुमय वर्तुळात एका बाजुला तिन ओळीत “श्री राजा शिव” व दुसर्या बाजुस दोन ओळीत “छत्रपत्ती” असे महाराजांच्या नाण्याचे सर्वसाधारण स्वरुप होते.तांब्याच्या या शिवराई पैशाचे वजन साधारणतः १२ ते १४ ग्रॅम इतके असते.शिवाजी महाराजांना आपल्या हिंदु धर्माचा रास्त अभिमान होता असे यावरून दिसते. तसेच मोगलांप्रमाणे सोन्याच्या मोहोरा न पाडता विजयनगरच्या हिंदू साम्राज्याच्या धर्तीवर सोन्याचे २.७२८ ग्रॅम वजनाचे होन पाडले.त्यावरही शिवराई प्रमाणे बिंदुमय वर्तुळात एका बाजुला तिन ओळीत “श्री राजा शिव” व दुसर्या बाजुस दोन ओळीत “छत्रपत्ती” असे लिहीलेले असे.
“शिवराई” नाण्यांबद्दल ची अशीच माहीती मी आपणापर्यंत
पोहचवण्याचा प्रयत्न करेन,
पुढील पोस्ट लवकरचं……….
कसं वाटलं जरुर कळवा……
खुप छान माहिती दिली आहे. असेच मार्गदर्शन करत रहा.
ReplyDeleteधन्यवाद सर.....आपल्या सेवेसी सदैव तत्पर....
ReplyDeleteखूप चांगला blog बनवला आशु।।।
ReplyDeleteआपले खुप आभार सर.....धन्यवाद....
ReplyDeleteखुप छान माहिती
ReplyDeleteखुप छान माहिती
ReplyDeleteखुप छान माहिती
ReplyDeleteखुप आभार आपले
ReplyDeleteखुप छान माहिती दिली आहे. असेच मार्गदर्शन करत रहा.
ReplyDeleteआपले खुप आभार....
ReplyDeleteलय भारी!!!!!
ReplyDeleteआपल्या सेवेसी तत्पर आशुतोष पाटील निरंतर...
Deleteलय भारी!!!!!
ReplyDeleteधन्यवाद बंधुराजे.....
ReplyDeleteउत्तम उपक्रम, आणि अतिउत्तम माहिती...👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद ब्लॉग लिहिल्याबद्दल.👍
एक सुचवायचे होते, ते नाण्यांचे फोटो हातावर ठेऊन न काढता पांढऱ्या कापडावर किंवा कागदावर ठेऊन काढले असते तर उत्तम..
Thanks for suggestion !
Delete