Sunday, February 5, 2017

शंभुछत्रपतिंचे चलन
शिवराई
भाग-2
संभाजी महाराजांच्या चलनाच्या माहीती संबंधीचा हा दुसरा भाग आहे. पहील्या भागात पहील्या प्रकारचे संभाजी महाराजांचे नाणे आपण पाहीले, ज्यावर पुढील बाजुनी “श्री/ राजा/ शंभु” असे अंकीत केलेले असुन मागील बाजुनी “छत्र/ पति” अंकीत केलेली असते.

               राजा सिव, राजा सीव
शिवाजी महाराजांच्या काही नाण्यांवर आपल्याला लेखनात बदल आढळलेला आहे त्यात विविधता  पहायला मिळतात, जसे “शिव”या शब्दाएवजी सिव, सीव, शीव असे अंकीत केलेले आढळते. तसेच संभाजी महाराजांच्या नाण्यावर देखिल हा बदल आढ्ळलेला आहे. संभाजी महाराजांच्या या काही नाण्यांवर “शंभु” या शब्दाएवजी “संभु” हा शब्द अंकीत केलेला आहे.

·       
  संभाजी महाराजांचे हे दुसर्या प्रकारचे नाणे-



“श्री/ राजा/ संभु” व “छत्र/ पति”
हे नाणे ही तांब्याचे असुन त्यावर पुढील बाजुनी बिंदुमय वर्तुळात तिन ओळीत “श्री/ राजा/ संभु” व मागील बाजुनी बिंदुमय वर्तुळात दोन ओळीत “छत्र/ पति” अशी अक्षरे अंकीत केलेले असतात. या नाण्याचे वजन, आकार, लेखन हे सर्व शंभु लिहीलेल्या नाण्यासारखेच असुन फ़क्त यावर “शंभु” या शब्दाएवजी “संभु” हा शब्द अंकीत केलेला आहे. बारकाईने निरिक्षन केल्यास
उलटा “छ”
या नाण्यावरील “छत्र” चा “छ” हा उलटा अंकीत केलेला आहे हे लक्षात येते. ही नाण्यासाठी डाय बनवनार्या कामगाराची चुक आहे असे दिसते. काही संग्राहकांना विचारले असता त्यांना ही नाणी कोल्हापुर भागात सापडली आहेत असे ते सांगतात, म्हणजे बहुदा ही नाणी तिकडेच टांकसाळीत करण्यात (पाडण्यात) आली असावीत, पण त्यावर काही ठोस पुरावा नसल्याने नेमकी ही नाणी कोणत्या टांकसाळीत पाडली हे सांगणे कठीण आहे.







“शिवराई” नाण्यांबद्दल ची अशीच माहीती मी आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन,
पुढील पोस्ट लवकरचं……….

कसं वाटलं जरुर कळवा……

photo curtesy- ameet lomate.

No comments:

Post a Comment