Friday, August 24, 2018

#Spink's mistake and my excitement !


#स्वराज्याचे_चलन


"#स्वराज्याचे_चलन" लिहिताना आलेला हा एक अनुभव आपल्यासोबत शेअर करतोय... 

स्वराज्याचे चलन लिहिताना रेफेरेंसेस मध्ये कुठेतरी वाचण्यात आलं कि १९९० साली स्पिंक ऑक्शन मध्ये शिवरायांच्या नावे असलेले २ शिवराई होन विकले गेले होते. त्यावेळी मी विविध डाय व्हरायटी असलेल्या शिवराई होणाच्या शोधात होतो. मी कॅटलॉग शोधण्याचा प्रयत्न केला सापडला नाही, पण ते २ होन कोणते हे पाहण्याची उत्सुकता होतीच... मग मी स्पिंक, लंडन च्या ऑफिस ला कॉन्टॅक्ट केला, त्यांना त्या कॅटलॉग बद्दल विचारल पण ते हि म्हणाले कि आता तो कॅटलॉग आमच्याकडेहि उपलब्ध नाही पण आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो. 


काही दिवसांनी त्यांचा रिप्लाय आला आणि कॅटलॉग मिळाला असा त्यांनी सांगितलं. मी त्यांना लॉट न ५९१ आणि लॉट न ५९२ च्या माहितीबद्दल विचारलं आणि काही दिवसात त्यांनी त्या कॅटलॉग मधील त्या डिटेल्स ची स्कॅन कॉपी पाठवली. मी ती पीडीफ वाचू लागलो लॉट न ५९१ बद्दल वाचून तर मला आश्चर्य वाटले त्यात लिहिलं होत कि "हा होन शिवाजी महाराजांच्या नावे असून यावर ५० असा आकडा आहे". हे वाचून काहीस वेगळं वाटलं. मी चेक केलं तर फोटो काही त्यांनी जोडलेले नव्हते मग मी त्यांच्याकडे फोटोबद्दलची मागणी केली. खरं तर ५० असा आकडा असलेला होन अजून तरी नजरेस आलेला नव्हता मी तो पाहण्यास अत्यंत उत्सुक होतो पण मला ते काही चिन्ह असावे अशी शंका होती. काही दिवसातच त्यांचा रिप्लाय आला त्यांनी स्कॅन फोटोस पाठवलेले होते. ते फोटोस मी पाहिले आणि शंकेचे निसरण झाले मला जे वाटले होते हे तेच होते. त्या नाण्यांवरील तो ५० आकडा नसून ते "चंद्र & सूर्य" चे चिन्ह होते. स्पिंक ऑक्शन ची झालेली चूक मी त्यांना सांगितली आणि ती चूक मी सुधारली तो होन "स्वराज्याचे चलन" पुस्तकात पा नं ४० वर 'शिवराई होन प्रकार क्र २.१' असा वर्गीकरीत केलेला आहे. या अनुभवात स्पिंक ऑक्शन ने मला लावलेली उत्सुकता हि शब्दात सांगणे कठीण...

#स्वराज्याचे_चलन
#अनुभव १
#आशुतोष_पाटील

No comments:

Post a Comment